
सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती रंगभवन चौक येथे संभाजी आरमारने उत्साहात अभिवादन कार्यक्रम केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
350 वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थानावर परकीय सत्तेचा अंमल असताना अशक्यप्राय वाटणारे स्वराज्य शिवरायांनी निर्माण केले. खऱ्या अर्थाने 6 जून 1674 हा हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे. शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची महान कामगिरी शिवरायांनी केली. स्वतःचे सिंहासन, चलन, नियम, मराठी भाषाकोश असे अनेक निर्णय प्रत्यक्षात आले. भारतीय जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना तयार झाली. जगात आज भारत शक्तिशाली देश म्हणून जी ओळख निर्माण करत आहे त्याची मुहूर्तमेढ म्हणजे शिवराज्याभिषेक असल्याची भावना अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केली. शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत मावळ्यांच्या शिवघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, शहरप्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमीत कदम, अर्जुन शिवसिंगवाले, शहर संघटक राज जगताप, रेवण कोळी, महिला आघाडीच्या शहरप्रमुख संध्या हेब्बाळकर, जिल्हा संघटक ऍड. गीता पवार, उमा रजपूत, शोभा घंटे, जानव्ही पतंगे, कोमल कोलकुंदी आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















