सोलापूर : देशातील अग्रगण्य डिझाइन कोचिंग संस्था ‘BRDS’ (भंवर राठोड डिझाइन स्टुडिओ) सोलापूर केंद्राने राष्ट्रीय पातळीवरील ‘NIFT २०२६’ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेत सोलापूर केंद्राच्या तब्बल १५ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये पहिल्या 4100 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हे सर्व यशस्वी विद्यार्थी आता NIFT च्या ‘कॉमन ॲडमिशन प्रोसेस’ (CAP) साठी पात्र ठरले आहेत. भारतामध्ये NIFT चे २० उत्कृष्ट कॅम्पस असून, त्याअंतर्गत ८ वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये ४ वर्षांचा ‘B.Design’ (बॅचलर ऑफ डिझाइन) हा पदवी अभ्यासक्रम चालवला जातो. या नामांकित कॅम्पसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता सोलापूरचे हे विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
गेल्या ५ वर्षांतील नेत्रदीपक कामगिरी
BRDS सोलापूर केंद्राने केवळ यावर्षीच नव्हे, तर गेल्या ५ वर्षांत सातत्याने सर्वोत्तम निकाल दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या केंद्रातून २७ विद्यार्थ्यांची विविध NIFT कॅम्पसमध्ये निवड झाली आहे. याशिवाय डिझाइन क्षेत्रातील इतर सर्वोच्च संस्थांमध्येही सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे; ज्यामध्ये ५ विद्यार्थ्यांनी NID (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन), ३ विद्यार्थ्यांनी आयआयटी (IITs), २ विद्यार्थ्यांनी सीईपीटी (CEPT) आणि १ विद्यार्थ्याने ‘एसपीए’ (SPA) नवी दिल्ली येथे प्रवेश मिळवून सोलापूरचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे.
भारतात सर्वाधिक सिलेक्शन देणारी संस्था
डिझाइन प्रवेश परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात संपूर्ण भारतात इतर कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तुलनेत ‘BRDS’चा सिलेक्शन रेट सर्वाधिक आहे. सोलापूर केंद्राच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Post Views: 24