मंगळवेढा : नववधूने सासूबाईचे दागीने व रोख रक्कम घेवून पोबारा केल्याने पोलीसांनी त्या नववधूचा शोध घेवून तिच्याकडून दागीने जप्त करुन ते सदर कुटूंबास परत केल्याने त्या कुटूंबातून समाधान व्यक्त होत आहे.
यातील फिर्यादी नामदेव सुखदेव जाधव (वय 38 रा.बावची) यांचे लग्न होत नसल्याने वय वाढू लागल्याने त्यांनी त्यांचा भाचा संतोष दामू भोसले (रा.भोसे) यांच्याकडून समजले की,पिंटू उर्फ नाना कोळेकर, शिवाजी कोळेकर, युवराज कांबळे (गुरुजी) सर्व रा.रड्डे हे लग्ण जमविण्याचे काम करतात. फिर्यादी यांनी लग्नाबाबत बोलणी केली. त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादीचा विवा अश्विनी मारुती दानोळे (रा.देवरुख जि.रत्नागिरी) हिच्यासोबत दि.22 फेबु्रवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता भोसे येथे विवाह साध्या पध्दतीने करण्यात आला. मुलीचा पहिला नवरा मारुती दानोळे हा वारला आहे असे खोटे सांगीतले होते. लग्न जमविण्यासाठी फिर्यादी कडून 1 लाख 50 हजार घेतले होते. चार महिने संसार व्यवस्थित चालू असताना आरोपी तथा नववधू अश्विनी दानोळे हिने दि.10 मे 2026 रोजी रात्री 11.30 वाजता फिर्यादीच्या आईचे तथा सासूचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण व रोख रक्कम त्याच रात्री घेवून निघून गेली. फिर्यादी तथा पती नामदेव जाधव यास रात्री 1 वाजता जाग आल्यावर आजूबाजूला पाहिले असता पत्नी अश्विनी आढळून आली नाही. पहाटे तीन वाजता अश्विनीने कॉल केला व मी सांगली मध्ये पोहचले आहे. सकाळी चिपळूणला जाणार असून चार दिवसाने परत येत आहे असे पतीस सांगीतल्यावर पतीने अचानक का गेलीस? असे विचारले असता जुन्या कामाचा हिशोब बाकी आहे पगार घेवून येते असे म्हणाली. दि.22 मे 2026 रोजी फिर्यादीने अश्विनी हिच्या मोबाईल मधील ईमेल आयडीवरुन लोकेशन शोधल्यावर तिचा पत्ता रत्नागिरी देवरुख दाखवल्याने फिर्यादी रात्री बाराच्या दरम्यान तिकडे रवाना झाले. याचा अधिक तपास पोलीस हवालदार कोष्टी यांनी करुन नववधूने फिर्यादीच्या आईचे पळवून नेलेले सोने जप्त करुन नववधूसह मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे हजर केले. जप्त केलेले सोने फिर्यादीच्या कुटूंबियांना स्वाधीन करण्यात आले.
फोटो ओळी
नववधूने पळवून नेलेले सोने जप्त करुन मुळ मालक नामदेव जाधव यांना देताना पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे,पोलीस हवालदार कोष्टी छायाचित्रात दिसत आहेत.
Post Views: 18