अकलूज – येथे हॉटेलमधून बाहेर पडलेल्या एका प्रवाशाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन मारहाण करत, त्याच्या खिशातील ९९ हजार ३५० रुपयांची रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
३ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास फिर्यादी हॉटेल ‘डिवाइन’ मध्ये जेवण करून एसटी स्टँडकडे जात होते. यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्यांना दुचाकीवर बसवून स्टँडवर सोडतो असे सांगून विश्वासात घेतले. मात्र, त्यांनी फिर्यादीला एसटी स्टँडवर न सोडता, केनालच्या बाजूने कच्च्या

अनोळखी व्यक्तींकडून लिफ्ट घेणे धोक्याचे’
अकलूजमधील या घटनेने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना निर्जन स्थळी नेऊन लुटण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः प्रवासात अनोळखी व्यक्तींच्या दुचाकीवर बसणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेवरून स्पष्ट होते. अशा लुटारूंवर पोलिसांची करडी नजर असणे आवश्यक असले तरी, नागरिकांनीही अनोळखी वाहनांत बसताना सावधगिरी बाळगणे हाच सर्वोत्तम बचाव आहे.
———————————
रस्त्याने नेऊन ‘गिरमे वस्ती’ जवळ एका निर्जनस्थळी थांबवले. तेथे आरोपींनी फिर्यादीला दुचाकीवरून खाली उतरवून काठीने मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ९९,३५० रुपये जबरदस्तीने काढून पळ काढला. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.
Post Views: 25