
बी. नारायणा फाऊंडेशन च्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण चे कार्यक्रम करण्यात आले. फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री शंकर बटगिरी यांनी वृक्ष लागवड हि काळाची गरज व एक झाड माझ्या नावाचं असा संकल्प घेऊन, परिसर हिरवं करावे, या विषयावर लोकांना संबोधित केले.यावेळी सोसायटी चे सचिव दिनकर नारायणकर यांनी वृक्षांची संगोपन करावे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी नरसिंग म्हंता, निखिल बटगिरी, संजीव सानी, मनिष बटगिरी, सागर बटगिरी,अनिल कुलकर्णी,रेवप्पा काळे, दिनकर नारायणकर , मल्लिनाथ अचलेरकर, विठ्ठल पवार, कलशेट्टी, सुनिल भैरामडगी, साईनाथ रसोलगीकर, सुनिल शिंदे, ईश्वर लोकरे, सोसायटीतील लहान व तरुण मुलेही उपस्थित होते.






















