Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मोडी लिपीतील पहिल्या शिवचरित्राचे प्रकाशन

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in mumbai
0
मोडी लिपीतील पहिल्या शिवचरित्राचे प्रकाशन
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई  : गेल्या हजारो वर्षात जगभरात अनेक वीरपुरुष, राजे, अनभिषिक्त सम्राट, राष्ट्रप्रमुख होऊन गेले आहेत, या सर्वांविषयी लिहिताना डॉ हेमंतराजे गायकवाड त्यांच्या पुस्तकात फक्त ग्रेट लिहितात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते “द ग्रेटेस्ट” असे लिहितात. डॉ गायकवाड यांचा जागतिक पातळीवरचा इतिहास सखोल आणि थक्क करणारा असल्यामुळे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सत्य गवसल्यामुळे ते अशी सप्रमाण तुलना करून एक चांगला पुस्तक आपल्यासमोर आणू शकले. यापूर्वी हे पुस्तक ४ भाषेत आले असले तरी जी मोडी लिपी सध्या प्रचलित नाही अस्तंगत होत असताना आज त्या लिपीत प्रकाशित होत आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या दहा अभ्यासकांनी हे काम स्वहस्ते केले आहे, याचबरोबर जगभरातल्या शिवाजी महाराजांच्या एकंदर साहित्यात पहिल्यांदा त्यांचे चरित्र मोडी लिपी पुस्तकाच्या स्वरूपाने येत आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर या देशात खूप पक्ष, राजकीय नेते, संघटना, इतिहासकार, साहित्यिक, विचारवंत मोठे झाले गायकवाड आणि यांच्यामध्ये हाच फरक आहे की शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व ते विविध भाषेत देशपरदेशात पोहोचवत आहेत आणि हे अभिनंदनीय आहे असे उदगार माजी खासदार आणि कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी काढले.
श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने दादर येथे ३५६ वा शिवराजाभिषेकानिमित्त ‘शिवोत्सव सोहळा’ आयोजित केला होता, या कार्यक्रमात “शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट” या  पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री  श्री.उदय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मुक्तपीठचे संपादक श्री. तुळशीदास भोईटे, शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार, मुंबई बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. संदीप सुर्वे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री. रवींद्र मालुसरे हे उपस्थित होते.
डॉ भालचंद्र मुणगेकर पुढे असेही म्हणाले की, शिवजन्मापूर्वी शहाजी राजांनी इतर पातशाह्यांच्या पदरी चाकरी केली, आपल्या मुलाने स्वतःचे परंतु रयतेचे राज्य निर्माण करावे असा प्रयत्न जिजामातांनी त्यांच्या जन्मापासूनच केला.त्यामुळेच शिवाजी महाराज घडले. महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत म्हणून त्यांची शिवजयंती आणि राज्याभिषेक दोनदोनदा साजरा करीत असतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार करावे. फक्त ५० वर्ष आयुष्य लाभलेल्या राजांचा इतिहास वाचताना लक्षात येते की, त्यांचे कार्य, त्यांची प्रतिभादृष्टी, त्यांची नैतिकता, त्यांची समाजाविषयी असलेली न्यायभूमिका, स्त्रियांच्याविषयी असलेला दृष्टीकोन, सर्व समाजाच्या हिताचा विचार करणारा राजा हे पहिले तर असा लोकोत्तर राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू राष्ट्र नव्हे तर एत्तद्देशीय लोकांचे राज्य असाच अर्थ आपण घ्यायला हवा. एकीकडे त्यांचा गोब्राम्हण प्रतिपालक असा प्रचार करायचा आणि दुसरीकडे त्यांना रयतेचा राजा असेही म्हणायचे अशी परस्पर छेद देणारी भूमिका ठरणारी आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणे पुरेसे नाही तर त्यांचा आदर्श जपत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जाणे आहे हे आपले कर्तव्य आहे.
सुरुवातीला संस्थापक डॉ हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेच्या वाटचालीचा प्रवास सांगून माझा पेशा डॉक्टरकीचा परंतु वयाची पंच्याहत्तरी साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजच हे काम माझ्याकडून करवून घेत असावेत असे मला वाटते असे म्हणाले.
पत्रकार तुळशीदास भोईटे आपल्या भाषणात म्हणाले की, स्वराज्याची राजधानी असलेल्या ज्या रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक आजही साजरा केला जातो त्याची पायथ्यापासूनची उंची सुमारे ८२० मीटर (२,७०० फूट) आहे. ३५० वर्षांनंतरही त्याठिकाणचे बांधकाम, पायवाटा, पाण्याची व्यवस्था याचे नियोजन आणि दृष्टीकोन किती चोख होते हे लक्षात येते. त्यांचा इतिहास वाचताना महाराज कसे अष्टवधानी होते. आजच्या काळात घडणाऱ्या घटनांच्याबाबतीत महाराज कसे वागले असते हे अभ्यासायची गरज नाही. देशातील इंधन व्यवस्था, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टचार, स्त्रियांवर होणार अत्याचार, तकलादू परदेशी धोरण, अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी याबाबत महाराज कठोर वागले असते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका सांगणारे महाराज स्त्रीअत्याचारात रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करतात. राजा कसा असावा तर ३५० वर्षानंतर सुद्धा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय असा  जगभर जयजयकार व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांची ही महानता डॉ गायकवाड वेगवेगळ्या भाषांतून पुस्तके  प्रकाशित करून जगभर पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.
पद्मश्री उदय देशपांडे यांनी लहान वयात मुलांच्यावर संस्कार आणि त्यांच्यासाठी मैदान किती महत्वाचे आहे हे शिवाजी महाराजांच्या बालपणाचे दाखले देत एक विडंबन कविता सादर करून विचार व्यक्त केले, सुनील पवार यांनी समितीच्या वतीने रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेकविषयी तर  मुंबई बँकेचे महाव्यवस्थापक संदीप सुर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती आणि शेतकऱ्यांविषयी घेतलेली भूमिका आपल्या भाषणात सांगितली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या भूमीत जन्म झाला त्या महाड-पोलादपूर तालुक्याचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे. रामकृष्ण बुटेपाटील यांनी मोडी लिपीचा प्रवास,महत्व आणि हा ग्रंथ कसा परिपूर्ण साकार झाला याविषयी थोडक्यात विचार मांडले.
सुरुवातीला कुमारी ऋतुजा पाटील, कुमार आरंभ गायकवाड, कुमार अरिहंत जाधव यांनी कविभूषण यांची शिवबावनी सादर केली त्याचे गद्य भाषेत वाचन कौशल पाटील यांनी केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक, संकलक आप्पा परब यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी आपल्या खड्या आवाजात  शिवबावनी सादर करून या मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
सुप्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री  श्री.उदय देशपांडे (राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार ), सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, दुर्गसंवर्धक श्री.श्रमिक गोजमगुंडे( हिरोजी इंदुलकर सन्मान पुरस्कार ), शिवचरित्रांची शेकडो पुस्तके आणि दुर्मिळ नाणी आणि वस्तूंचे संग्राहक श्री. राजा जाधव ( सर रामकृष्ण भांडारकर सन्मान पुरस्कार ), हुतात्मा स्मारक समिती प्रमुख, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री. भाऊ सावंत (रामचंद्रपंत अमात्य सन्मान पुरस्कार), शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे जनसंपर्क प्रमुख श्री. रंजन गावडे ( सुभेदार तानाजी  मालुसरे सन्मान पुरस्कार), मराठाकालीन शस्त्रात्रांचे कलात्मक प्रतिकृती निर्माते रुद्र आर्टचे श्री. सत्यजित वैद्य (वीर बाजीप्रभू देशपांडे सन्मान पुरस्कार ) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पुस्तकाचे मोडी लिपी तज्ज्ञ, लिप्यंतरकार आणि ज्येष्ठ अभ्यासक सर्वश्री रामकृष्ण बुटेपाटील, भाऊ घाडीगावकर, अरविंद कटकधोंड, डॉ. राहुल सारडा, डॉ. तेजस लोखंडे, राम वाघोले, चंद्रशेखर पालव, प्रसाद सुतार, रोहिदास राऊत, तेजस्विनी भावे यांना “बाळाजी आवजी चिटणीस सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री समीर वारेकर आणि राहुल मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन पत्रकार राजन देसाई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती सुर्वे, दिगंबर चव्हाण, आदित्य अवताडे, गौरव गायकवाड, साक्षी यादव यांनी विशेष मेहनत घेतली.

Post Views: 26
Previous Post

बी. नारायणा फाऊंडेशन च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

Next Post

मंगळवेढ्यातील ब्रह्मदेव मूर्तीची उदासीन स्थिती; पुरातत्व खात्याने तातडीने हस्तक्षेप करावा, स्थानिकांचाआग्रह

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मंगळवेढ्यातील ब्रह्मदेव मूर्तीची उदासीन स्थिती; पुरातत्व खात्याने तातडीने हस्तक्षेप करावा, स्थानिकांचाआग्रह

मंगळवेढ्यातील ब्रह्मदेव मूर्तीची उदासीन स्थिती; पुरातत्व खात्याने तातडीने हस्तक्षेप करावा, स्थानिकांचाआग्रह

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1032738

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!