सोलापूर – घरची परिस्थिती जेमतेम…. वडील सुलतान शेख हे टेम्पो चालवून चरितार्थ चालवितात.तर दोघांच्या शिक्षणासाठी खर्च करणे शक्य नसल्याने लहान भाऊ आदमने मोठ्या भावाला प्रोत्साहन देऊन स्वतः शिक्षणासाठी केलेला त्याग… जिद्द न सोडता तब्बल बारा वर्षे केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले अन् वडाळा येथील अबुहसन सुलतान शेख या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केले.अबुहसनची महसूल सहाय्यक (औद्योगिक न्यायालय) या पदावर नियुक्ती झाली आहे.
अबुहसन हे वडाळा येथील माऊली महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांचे शालेय शिक्षण वडाळा येथील काकानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू हायस्कूलमध्ये झाले.तर महाविद्यालयीन शिक्षण माऊली महाविद्यालयात झाले.2011 मध्ये बी.ए.पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेची तयारी केली.अनेकवेळा अपयश येऊन देखील अबुहसन यांनी चिकाटी सोडली नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिले.
हे यश मिळविल्याबद्दल श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साठे यांनी अबुहसन व त्यांचे वडील सुलतान खतीब यांचा सत्कार केला.यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड, दत्तात्रय वीर, सुभाष गायकवाड,आयुब सय्यद, अमोल गायकवाड उपस्थित होते.
फोटो ओळी – वडाळा येथील माऊली महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अबुहसन सुलतान खतीब यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे यांनी त्यांचा व अबुहसन यांचे वडील सुलतान खतीब यांचा सत्कार केला.त्यावेळी छायाचित्रात श्यामसुंदर गायकवाड, सुभाष गायकवाड आदी.
Post Views: 11