सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्यावतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली इयत्ता १० वी – १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच १० वी – १२ वी नंतर पुढे काय?” या विषयावर करिअर मंत्र मार्गदर्शन कार्यक्रमाचे येत्या रविवारी दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी १०. १५ वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय पंढरपूर-मंगळवेढा बायपास रोड मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, कवी व कीर्तनकार अविनाश भारती हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















