सांगोला – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर बुरलेवाडी, मेडशिंगी (ता.सांगोला) येथील युवा कुस्तीपटू संतोष मल्हारी ठोंबरे याने नेपाळ येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल फॅबटेक उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी इस्टेट डायरेक्टर डाॅ.संजय आदाटे, वडील मल्हारी ठोंबरे उपस्थित होते.
संतोष ठोंबरे याचे आई-वडील हे शेतमजूरी करून उदरनिर्वाह करत आहे. तो कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे. आई वडील कष्ट करून मुलाच्या स्वप्नांना बळ देत आहेत. संतोष ठोंबरे यानी कुस्तीच्या आखाड्यात जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या खेळाडूला पुढील स्पर्धांसाठी आर्थिक मदतीची गरज असून समाजातील इच्छुक दानशूर व्यक्ती, उद्योगपती, लोकप्रतिनिधी आणि क्रीडाप्रेमींनी मदतीसाठी मो.नं.८७६७४५६६८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट-
भाऊसाहेब रूपनर यांचेकडून आर्थिक मदत
फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी आतापर्यंत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन संतोष ठोंबरे या खेळाडूला मोठा आधार दिला आहे. त्यांच्या या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post Views: 39