Friday, June 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

तरुण भारतbyतरुण भारत
June 12, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतीमधील पीक काढणीनंतर उरणारे काडी, तुराट्या, धसकटे ,भुस्कट आणि अन्य अवशेषांना आता नवी किंमत प्राप्त होत आहे. शेतकऱ्यांसाठी अनेकदा ओझे ठरणारा आणि जाळून टाकला जाणारा हा  कचरा भविष्यात उत्पन्नाचे ठोस साधन ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेतातील काडी कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या नवीकरणीय डिझेलचा चारचाकी वाहनात वापर करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यशस्वी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता देशातील शेतकरी केवळ ‘अन्नदाता’ न राहता ‘ऊर्जादाता’ व ‘परकीय चलनाचा संरक्षक’ म्हणून नवी ओळख निर्माण करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मूल्यवर्धित शेतीला चालना देणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प केला आहे. कृषी अवशेषांपासून तयार होणारे नवीकरणीय डिझेल हा त्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या महाराष्ट्रातील ग्रीनज्यूल्स या कंपनीसोबत या नाविन्यपूर्ण विषयावर आपण काम सुरू केले आहे. शेतीतील टाकाऊ अवशेष व  कचऱ्यापासून तयार केलेले नवीकरणीय डिझेल वापराच्या दृष्टीने पारंपरिक डिझेलइतकेच प्रभावी असल्याचे प्राथमिक चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. शेतातील इतर टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले हे नवीकरणीय डिझेल वाहनात वापरल्यावर गाडीचा परफॉर्मन्स अत्यंत समाधानकारक राहिला. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना कृषी अवशेष विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक स्तरावर ऊर्जा सुरक्षेचे प्रश्न, इंधनाच्या वाढत्या किमती आणि परकीय चलनावरील ताण ही गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत उपलब्ध असलेल्या शेतीमधील अवशेष व कचऱ्यापासून इंधननिर्मिती झाल्यास परदेशी इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही नवीकरणीय डिझेल हा प्रभावी पर्याय ठरणार आहे. आजच्या घडीला शेतातील कचरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अनेक बाबी उद्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत होऊ शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविणे, या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी या क्षेत्रातील संशोधन आणि उद्योगांची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

शेतकरी आता अन्नदाता, उर्जादाता न राहता परकीय चलन वाचवणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.राज्यात दरवर्षी ३० % कांदा सडतो, तसेच मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेले अनेक फळे पिके कमी किंमत मिळते म्हणून शेतकरी टाकून देतात,बाजार समितीच्या आवारात देखील भाजीपाल्याचे अवशेष शिल्लक राहतात.कृषी अवशेषांपासून इंधननिर्मिती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून मोदींजींच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नात महत्वाचे पाऊल ठरणार आहे.हा प्रयोग ही केवळ तांत्रिक नवकल्पना नसून, शेतकरी, पर्यावरण आणि देशाच्या आर्थिक स्वावलंबनाला जोडणारा नवा विकासमार्ग आहे.
देशात दरवर्षी ६२ दशलक्ष मेट्रिक टन कृषी अवशेष उपलब्ध होतात, ज्यातून गॅस बनू शकतो. सध्या आपण या क्षमतेचा केवळ १ टक्काच वापर करत आहोत. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात ५००० सीबीजी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास भारत इंधनाच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी होईल,” असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारचे उचित धोरण तयार व्हावे तसेच पुढील काळात याची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Post Views: 24
Previous Post

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

Next Post

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

ताज्या बातम्या

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासन आक्रमक; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची अचानक पाहणी

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906246

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697