सोलापूर – घराजवळ शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना करमाळा येथे गुरुवारी रात्री अकरा वाजता घडली .
आकाश सोमनाथ अगरे (वय 33 वर्षे , राहणार करमाळा ) असे त्या मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून गुरुवारी रात्री अकरा वाजता राहत्या घराजवळ शिव्या दिल्याचा जाब विचारला म्हणून त्याला टिलू चौतमास आणि रजनी आकाश कांबळे यांनी मारहाण केली .यात डोक्याला जखम व सर्व अंगाला मुकामार लागल्याने त्याला करमाळा येथील आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात पत्नी गौरी हिने आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता दाखल केले .
Post Views: 42