माढा : विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टें.) संचलित आर्या कृषी महाविद्यालय, मानेगाव ता. माढा यास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मान्यताप्राप्त मुक्त कृषी शिक्षण अभ्यासकेंद्राची (अभ्यासकेंद्र संकेतांक : ६५१८२) मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, शेतकरी, कृषी उद्योजक तसेच स्वयंरोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवक-युवतींसाठी कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित, रोजगाराभिमुख व व्यावहारिक शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे मुक्त कृषी शिक्षण अभ्यासकेंद्र आर्या कृषी महाविद्यालयात सुरू करण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष श्री. रणजितसिंह शिंदे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या प्रेरणा व पाठबळामुळेच हे अभ्यासकेंद्र सुरू करणे शक्य झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन उबाळे यांनी दिली.
Post Views: 12