सोलापूर – उच्च शिक्षण सोलापूर विभागीय सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी गोविंद बोंदर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आता कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी प्रज्ञा कांबळे यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील त्यांच्या कार्यालयात पदभार स्वीकारल्याबद्दल सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने नूतन अधिकारी सौ. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी युनियनचे शहाजी जाधव, भानुदास घंधुरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणार
“कार्यालयात येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती पडताळणी आणि सेवानिवृत्तांची अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रकरणे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही,” अशी ग्वाही सौ. कांबळे यांनी यावेळी दिली.
Post Views: 10