
सांगोला – जि.प.प्रा.केंद्र शाळा, एखतपूर (ता.सांगोला) येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात इ.१ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवाद्य मिरवणुकीने झाली. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, जि.प.सदस्या सिंधुताई आलदर, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, सरपंच वर्षाताई जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रतिक्षा नीलकंठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खाजगी शाळांमधून जि.प.शाळेत प्रवेश घेतलेल्या २० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख सुखदेव लवटे, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी, कृ.उ.बा.समितीचे सदस्य हरिबा इंगोले उपस्थित होते.
मनोगतात आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्वतःचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून झाल्याचा उल्लेख करून शाळेच्या आवश्यक मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक मुख्याध्यापक हणमंत जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक दिलीप नवले, भारत मेटकरी, नीलकंठ, ज्ञानेश्वर इंगोले, निसार इनामदार, काळेबाग, संजय बुरांडे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 5