सांगोला – विद्यामंदिर प्रशालेत इ.५ वीत प्रवेश करणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. सुरुवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास नवागत विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या सुंदर फुग्यांच्या कमानीतून विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यानंतर प्राचार्य चारूदत्त जगताप, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासो नरूटे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या या सुंदर स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळाला. यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवागत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके यांनी शुभेच्छा दिल्या.