
पिलीव – माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेतील नवागतांचे पहील्या दिवशी गझी ढोलाच्या तालावर तालावर स्वागत करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समीती पालक, शिक्षक यांच्या संकल्पनेतून गझीढोल या पारंपरिक कार्यक्रमाने पहिलीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष भाऊसाहेब अस्वले, उपाध्यक्ष नितीन तांबवे, बाबासाहेब तांबवे, अरुण कोकरे, आनंदा सुळ, किसन गोरे, गणेश सुळ, अक्षय देवकते, सुखदेव पवळे, जगन्नाथ देवकते, सय्यापपा सुळ, मुख्याध्यापक प्रमोद तोरणे, भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















