
सांगोला – नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा माने व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा सेना तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे सांगोला नगरपरिषदेस भेट दिली. सदर वृक्षांचे सांगोला नगरपरिषदेच्यावतीने शहरातील वासूद चौक ते कडलास नाका रस्त्यावरील दुभाजकामध्ये तसेच न्यू इंग्लिश स्कूल क्रीडा मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष आनंदा माने, सागर पाटील, जि.प.सदस्य दादासाहेब लवटे, पं.स.उपसभापती अजय सरगर, नगरसेेेवक काशिलिंग गावडे, अरुण पाटील, बाळासाहेब आसबे, संजय केदार व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आनंदा माने यांनी शहरातील इतर नागरिक, उद्योजक, व्यापारी व सामाजिक संस्थांनाही वाढदिवस, वर्धापन दिन यासारख्या विशेष प्रसंगी सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करत पुढील पाच वर्षात नगरपरिषदेकडून एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Post Views: 10