सोलापूर – डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने चॅम्प चेस स्कूल व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वाद चषक’ खुली व महिला गटाच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अकरा वर्षीय प्रतिभावान खेळाडू श्रेयस कुदळे याने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मातब्बर खेळाडूंचा पराभव करत सात पैकी साडेसहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच बार्शीची राष्ट्रीय खेळाडू सान्वी गोरे हिने महिलांच्या गटात पूर्णपणे वर्चस्व ठेवत सहा पैकी सहा गुणांसह जेतेपद पटकाविले. तसेच आदिराज म्हेत्रे, नियान कांदिकटला, आयुष बदवणे, पृथा ठोंबरे, संस्कृती जाधव, ईशा पटवर्धन यांनीदेखील आकर्षक खेळ करत अनुक्रमे १५, ११ व ८ वर्षांखालील गटात अव्वल स्थान मिळविले.
खुल्या गटात बार्शीचा मानांकित शंकर साळुंके, विहान कोंगारी व प्रज्वल कोरे यांनी उत्कृष्ट खेळत व मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे हिने ५ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर सृष्टी तोंडले व बार्शीची आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अनन्या उलभगत यांनी प्रत्येकी चार गुणांसह तिसरा व चौथा क्रमांक पटकावित सोलापूर जिल्हा संघातील स्थान निश्चित केले. प्रथम आलेल्या चारही खेळाडूंची निवड आगामी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
जुळे सोलापुर येथील टाकळीकर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक मिथिलेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ख्यातनाम बालरोगतज्ञ डॉ. वेंकटेश यजुर्वेदी, स्पर्धेचे प्रायोजक व नामवंत उद्योजक गणेश सावंत, सादिक नदाफ, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी स्पर्धेचे प्रमुख पंच उदय वगरे, उद्योजक प्राणेश वैद्य, टाकळीकर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मिथिलेश पांडे व डॉ. वेंकटेश यजुर्वेदी यांनी उपस्थित खेळाडू व पालकांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. उच्च ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि समर्पण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहाय्यक पंच म्हणून राष्ट्रीय वरिष्ठ पंच रोहिणी तुम्मा-राठी, पद्मजा घोडके आदींनी यशस्वीरित्या काम पाहिले.
विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.
अंतिम निकाल (अनुक्रमे क्रमांक, गुण व बोकोल्स गुणांसह):
खुला गट: श्रेयश कुदळे – ६.५, शंकर साळुंखे- ६,विहान कोंगारी- ५.५ (२९), प्रज्वल कोरे-५.५ (२६.५), मानस गायकवाड-५ (३१.५), दत्तात्रेय गोरे-५(२४.५),युवराज गायकवाड-४.५ (२९.५), चंद्रशेखर बसर्गीकर-४.५ (२९), देवदत्त पटवर्धन-४ (२८.५), सुप्रीत घनाते-४ (२७.५)
१५ वर्षे मुले: अदिराज म्हेत्रे -५.५, नैतिक होटकर-५ (२४.५), नागेश राजमाने-५, श्रेयश कंदीकटला-४.५ (२६), हिमांशू व्हनगावडे-४.५ (२४)
११ वर्षे मुले: नियान कंदीकटला-५, वेदांत पांडेकर-४.५ (२७.५), श्लोक चौधरी-४.५ (२४.५), श्रेयश इंगळे-४.५ (२४), नचिकेत तोंडले-४
८ वर्षे मुले: आयुष बदवने- ४,नक्ष श्रीराम-३ (२३),मिथिलेश होर्टीकर-३ (२०.५), ओम सारवडकर-३(२०), विराज शेंडगे-३ (१८)
महिला गट: सानवी गोरे-६, स्वराली हातवळणे-५, सृष्टी तोंडले-४.४ (१९.५), अनन्या उलभगत-४.५ (१८.५), नवीना वडीशेरला-४ (१७), साक्षी पाटील-४ (१५.५), आरोही दलाल-३ (१९), सानवी होर्टीकर-३ (१८.५), काव्या पाटील-३ (१७), दिशा भांडेकर-२
१५ वर्षे मुली: पृथा ठोंबरे-४ (२१), तेजल चीलगुंडे-४ (२०.५), खुशी तोंडले-४ (१६.५), स्वरा कस्तुरे-३ (१६), फिजा शेख-३ (१४)
११ वर्षे मुली: संस्कृती जाधव-४,मनस्वी क्षीरसागर-३(२०.५),श्रुती बनसोडे-३(१९.५), आर्वी सदाफुले-३(१५), हिंदवी मोरे-२
८ वर्षे मुली: ईशा पटवर्धन-४,श्रुती भारती-२(१७),त्रिशा पाडूळे-२(१५),शार्वी गांधी-१(१२),श्रीजा जांभळे-१






















