सांगोला – तालुक्यातील हनुमान इंग्लिश मिडीयम स्कुल कटफळ, सांगोला गुरुकुल सांगोला, बाळुमामा गुरुकुल सांगोला, विश्वशोभा प्राथमिक विद्यालय मेडशिंगी या अनाधिकृत शाळा असुन सदर शाळेस शासकिय कोणत्याही प्रकारची मान्यता अथवा मंजुरी नाही, अशी माहिती शिक्षण विभाग पंचायत समिती, सांगोला यांनी दिली. सदर शाळांची माहिती वरिष्ठ कार्यालयास दिलेली असुन त्यांच्यावर कारवाई प्रस्तावीत आहे. त्यामुळे आपण आपल्या पाल्याचा प्रवेश सदर शाळेत घेवु नये. आपण सदर शाळेत प्रवेश घेतल्यास आपल्या पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास आपण सर्वस्वी स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे सांगोला तालुक्यातील पालकांना प्रशासना मार्फत कळविण्यात आले आहे.
Post Views: 23