जेऊर – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मांगी या गावातिल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.सदस्य सुजित तात्या बागल हे गेली अनेक वर्षा पासुन विविध उपक्रम राबवत आहेत.त्यापैकी गेली वर्षभरा पासून पटसंख्या कमी असल्यामुळे डबघाईला आलेल्या
जिल्हा परिषद शाळांसाठी कार्य करत आहेत गेल्या वर्षी मांगी जिल्हा परिषद शाळेमधील जे पालक मांगी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करतील अशा पालकांची घरपट्टी सुजित तात्या बागल यांनी भरलेली आहे .गेले वर्षी सुजीत बागल यांनि ग्रामस्थान सह मांगी पंचकरोषितील पालकांना आपले मूल -मुली ना जिल्हा परिषद शाळेत पाठवा हे अवाहन् केले होते या अनोख्या उपक्रमाला पालकांनी भरपुर प्रतिसाद देत मांगी गावातील २० पालकानी
मांगी जिल्हापरिषद शाळेत त्यांचे मुला मुली चे एडमिशन घेतले होते. तेवढ्या २० पालकांची घरपट्टी सुजित बागल यानी स्वतः ग्रामपंचायत मधे भरली मागील वर्षी प्रमाणे या हि
वर्षी मांगी जिल्हा परिषद शाळेत जवळपास १८ पालकानी आपले मुलां मुलीचे एडमिशन् घेतले असता याही वर्षी १८ पालकांची घरपट्टी सुजित बागल हे स्वतः ग्रामपंचायत मधे भरणार आहेत .सुजीत बागल यानी गेली अनेक वर्षा पासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकुन दिलेले आहे.मांगीसह तालुक्यातील गावा- गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचे मोलाचे योगदान असते .मागील दोन तिन वर्षांपासुन पर्यावरण पूरक वृक्ष लागवडीतून हज़ारो झाड़े सुजीत तात्या बागल यांचे माध्यमातुन विविध ठिकाणी लावलेली आहेत .येणाऱ्या काळामध्ये मांगीसह परिसरात किमान ५ हज़ार पर्यावरण पूरक झाडे लावून जोपासण्याचा त्यांच उद्दिष्ट आहे.गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी पटसंख्येच्या कारणास्तव बंद पडत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा या बंद पडू नये त्यासाठी मी इथून पुढे ही तन-मन-धनाने काम करणार असून गांव खेड्यातील प्रतेक पालकानी
जिल्हा परिषद शाळेत च आपल्या मुला मुलींचे एडमिशन घ्यावे असे अवाहन सुजीत बागल यानी या माध्यमातुन् केले आहे .यावेळी
मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत वीर, श्रीम. वैशाली शेटे मॅडम, श्रीम.सुनिता काळे मॅडम, श्रीम. आशा देमुंडे मॅडम तसेच निखील बागल, आण्णासाहेब बागल व सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल उपस्थित होते.
Post Views: 10