सोलापूर – राज्य शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी यूजर चार्जेस आकारणी बाबत गठीत केलेल्या समितीमध्ये पुणे महसुली विभागातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्य पदावर निवड करण्यात आली. या समितीची पहिली बैठक पुणे येथे 25 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ८ दि.२८ मार्च २०२२ अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ३१ मध्ये दुरुस्ती करून कलम 1अ नव्याने समाविष्ट करून बाजार समितीचे क्षेत्रात ज्या ठिकाणी व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे व त्या ठिकाणी व्यापारासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी होत असलेल्या अनुसूचिमध्ये नसलेल्या शेतमालाचे व अकृषीक मालाचे व्यापारावर यूजर चार्जेस आकारणीबाबत शासनाने बाजार समित्यांना अधिकार प्रदान केलेला आहेत.
राज्याचे पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ९ जून रोजी झालेल्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे यूजर चार्जेस आकारणी बाबत समिती गठीत करण्याचे ठरले त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमध्ये पुणे महसुली विभागातून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्य पदावर निवड करण्यात आली. या समितीची पहिली सभा गुरुवार २५ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथे पणन संचालक यांचे दालनात आयोजित केली असल्याचे पणन संचालक शरद जरे यांनी सांगितले आहे.
Post Views: 14