
मंगळवेढा शहरातील सर्वात मोठ्या इमारतीचे काम रखडल्यामुळे सामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी याची प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन उर्वरित निधी उपलब्ध करून देऊन त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे व उद्घाटन सोहळा करून सर्वांसाठी सांस्कृतिक भवन खुले करावे. अशी मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना देण्यात आली. यावेळी डॉ.सुभाष कदम, अॅड.रमेश जोशी, मल्लय्या स्वामी, लक्ष्मण नागणे, यतीराज वाकळे, दिगंबर भगरे, संभाजी सलगर, राजेंद्र जाधव, अकबर मुलानी, चंगेजखान इनामदार, सय्यद इनामदार, लहू ढगे, अजय आदाटे, सतीश दत्तू, गणेश मेहरकर उपस्थित होते.
























