
सोलापूर- दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल सोलापूर शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अ.अब्दुल गफुर सगरी हे अध्यक्षस्थान होते. पर्यवेक्षिका सौ . सादेका बारागजी, शिक्षक जुल्फिकार नदाफ, फारूक बिद्री व ग्रंथपाल जाफर बांगी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच गुलाबांच्या पंखळ्यांचे वर्षाव करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन प्रवेश घेणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देण्यात आले.
यावेळी परविन मुजावर, सरदार नदाफ, एजाज शेख, निकहत शेख, मेहरून सय्यद, महेर शेख, हिना कौसर चितापुरे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल जाफर बांगी यांनी केले.

























