
सोलापूर -प्रगत शेती आणि वैज्ञानिक पीक पोषण पद्धतींमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील कोंढार चिंचोली,करमाळा तालुक्यातील सरपंच शरद नाथसाहेब भोसले यांना ऊस लागवडीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाधन योद्धा पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.या पुरस्काराद्वारे संतुलित पीक पोषण, वैज्ञानिक शेती पद्धती आणि कार्यक्षम अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून उल्लेखनीय उत्पादनक्षमता साध्य करणाऱ्या प्रगत शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. हा सन्मान पीक उत्पादनक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक पीक पोषण उपाययोजनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करतो.कार्यक्रमात बोलताना पुरस्कार विजेते शरद नाथसाहेब भोसले यांनी आपले मत मांडले.

























