सोलापूर : चायनीज गाडीवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला कोयता दाखवत धमकावल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण भीमराव पेद्दे (रा. लहान इरण्णा वस्ती, रामवाडी, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत दीपक नागनाथ चलवादी (वय २५वर्ष, रा. शामा नगर झोपडपट्टी, मोदी सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे .
फिर्यादी हे १८ जून रोजी एका मोदी भागातील एका चायनीजच्या गाड्यावर गेले असता, तिथे त्यांचा वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने २० जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी हे त्यांच्या बहिणीसोबत इरण्णा वस्तीकडे जात असताना आरोपीने फिर्यादीच्या अंगावर लोखंडी कोयता घेऊन मारण्यासाठी धावून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मोरे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 11