आज जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय धावपटू साईश्वर केशव गुंटूक व श्रद्धा केशव गुंटूक या दोन खेळाडूंनी योग दिनाचे औचित्य साधून आज पहाटे 21 किमी अंतर रनिंग पूर्ण करून त्यानंतर साईश्वर व श्रद्धा यांनी प्रत्येकी 501 सूर्य नमस्कार घालून योग दिन साजरा केले. 21 किमी अंतर सोनी कॉलेज ते सोरेगाव पुन्हा सोरेगाव ते सोनी कॉलेज या पद्धतीने 3 लुप् मध्ये 21 किमी अंतर पूर्ण करत एस आर पी एफ येथे सांगता केले. साईश्वर 21 किमी 1 तास 26 मिनिटे 09 सेकंदात तर श्रद्धा हिने तेव्हढेच अंतर 1 तास 42 मिनिटे 18 सेकंदात पूर्ण केले तसेच एस आर पी एफ कॅम्प येथील मैदानावर प्रत्येकी 501 सूर्य नमस्कार पूर्ण केले.
*योगासने हा भारतीय संस्कृतीचा* एक महत्त्वाचा आणि अमूल्य घटक आहे. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक शांतता लाभते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
या जागतिक योग दिनानिमित्त आपण सर्वांनी योगाचा स्वीकार करून निरोगी, आनंदी आणि तंदुरुस्त जीवन जगण्याचा संकल्प करूया. आरोग्य हेच धन आहे. खेळाडूंच्या आरोग्यासाठी योग हा एक उत्तम व्यायाम आहे. आजच्या योग दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून नियमितपणे योग करत आपले आरोग्याची काळजी घेऊ असा एक अमूल्य संदेश ह्या दोन खेळाडूंनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
या दोघांना सिनियर ऑलिंपियन केशवराज सिंह तसेच प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे सर, प्राचार्य चिदानंद माळी सर व क्रीडा प्रशिक्षक कृष्णा कोळी सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच एस आर पी एफ (राज्य बल गट क्रमांक 10) चे समादेशक व वरीष्ठ अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Post Views: 5