
वळसंग – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच मनसे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे, अँड. सुधीर पाटसकर, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर आणि लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट मनसेच्या वतीने ‘सोलार वारी’ कंपनीच्या सलगर येथील अधिकाऱ्यांची व व्यवस्थापनाची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने, प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना आणि गावातील तसेच परिसरातील स्थानिक मजुरांना कामात प्रथम प्राधान्य द्यावे, इतर राज्यांतून मजूर आणून स्थानिक तरुणांवर अन्याय करू नये. कामासाठी आवश्यक असणारे ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर, कार, जीप आणि पिकअप यांसारखी वाहने स्थानिक लोकांचीच भाड्याने घेण्यात यावीत. कर्नाटक, आंध्रप्रदेश किंवा हैदराबाद यांसारख्या परराज्यांतून वाहने आणू नयेत. कामगारांचे पगार आणि वाहनांचे भाडे वेळेवर व नियमितपणे देण्यात यावे. या भागातील सुशिक्षित व गरजू मुलांना तात्काळ रोजगार उप-लब्ध करून द्यावा. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना मनसेचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील, तालुका उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, किणी गटाध्यक्ष काशिनाथ मरतुरे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी-पाटील, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, सलगर शाखाध्यक्ष महेश चिकमळ, मनसैनिक काशिनाथ बंदीछोडे, राजू घंटे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते (मावळे) आणि स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 11