सोलापूर – दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स् फेडरेशन, मुंबई व सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ऑगस्ट, २०२६ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. फेडरेशन चे अध्यक्ष मा.श्री. अजय ब्रम्हेचा यांनी आर.बी.आय.च्या रोजच्या नवनवीन नियम व धोरणामुळे बँकांना दैनंदिन काम करणे सुलभ व्हावे यासाठी बँक कर्मचा-यांनी प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे व प्रशिक्षणामुळे बँकांची प्रगती होण्यास मदत होईल असे सांगितले. आर.बी.आय. चे जनरल मॅनेजर मा.श्री. हरी प्रसाद पटनाईक यांनी “RBI Inspection and Compliance” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्या व्याख्यानात म्हणाले की, आर.बी.आय. व जागतिक वित्तीय मानकांनुसार KYC होणे आवश्यक आहे त्यामुळे खातेदारांच्या खात्यांची सुरक्षा वाढते व निधीचे संरक्षण होते व तुमच्या खात्यांमध्ये होणारा अनधिकृत प्रवेश रोखते. अंतर्गत लेखापरीक्षण करताना ज्या काही बँकेच्या त्रुटी असतील त्या लेखापरीक्षकाने निदर्शनास आणून दिले पाहिजे व बँकेने त्या सुधारणा करावेत जेणेकरून पुढील होणारा धोका टाळता येईल. तसेच बँकेने आपले आर्थिक आरोग्य, जोखीम व्यवस्थापन, प्रशासकीय मानकांचे मुल्यांकन इ. वर भर देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. आर.बी.आय. चे जनरल मॅनेजर मा.श्री. संतोष कुमार पांडे यांनी “Investment” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्या व्याख्यानात म्हणाले की, ट्रेझरी विल्स, सरकारी रोखे, राज्य विकास कर्जे इ. वर बँकांनी गुंतवणूक करावी व गुंतवणूक करण्यापूर्वी परतावा, जोखीम, शुल्क, तरलता राखा व वैविध्यपूर्ण गुंतवणूक करा असे त्यांनी सांगितले तसेच आर.बी.आय. चे गुंतवणूक धोरण, निर्देश, मर्यादा हेही पाळणे गरजेचे आहे व तसेच सहकारातील कार्य करणा-या घटकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे असेही सांगितले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. दिपक मुनोत यांनी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केले. फेडरेशन चे अध्यक्ष मा.श्री. अजय ब्रम्हेचा यांनी वक्त्यांचे परिचय करुन दिले. असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. दिपक मुनोत, फेडरेशन चे संचालक सीए श्री. राजगोपाल मिणियार, श्री. अशोक शेळके, श्री. रत्नाकर कदम, सीईओ श्री. प्रसाद पाटील, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश मुळे, सीईओ श्री. उमेश विरधे असोसिएशन च्या संचालिका सौ. संगीता फाटे, सीईओ सौ. शुभांगी ढवळे सह सोलापूर जिल्हयातील नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक इ. उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















