
बार्शी – विधान परिषदेचे निवडणूक आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयाची घोषणा सोलापुरात होताच बार्शी शहर व परिसरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला नगराध्यक्ष सभापती नगरसेवकांसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करत राजेंद्र राऊत यांच्या निवडीचा आनंद साजरा केला.
.नगरपरिषदेच्या समोर नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, नगरसेविका कांचन मोहिते, सुनीता ढोणे, अर्चना बारस्कर, उर्मिला मोहिते, सुजाता मस्के, उर्मिला मुळे, फर्जाना जलसे, चंद्रकला कांबळे या नगरसेविकांसह असंख्य महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी फटाक्यांची मोठी अतिषबाजी करण्यात आली…… नगराध्यक्ष तेजस्विनी कचरे यांच्या सह सर्व नगरसेविकांनी राऊत येथील राजेंद्र आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर ही मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी राजेंद्र राऊत यांच्या पत्नी कविता राऊत यादेखील आनंदात सहभागी झाल्या होत्या.
राजेंद्र राऊत यांचे कार्यालय असलेल्या कर्नल भोसले चौक येथेही पेढे आणि लाडू वाटप करत आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला……. सुभाष नगर, राऊत चाळ, सोमवार पेठ, भवानी पेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ, कचेरी रोड, अलीपुर रस्ता, हांडे गल्ली, उपळाई रस्ता, परंडा रस्ता, गाडेगाव रस्ता, कुर्डूवाडी रस्ता, कासारवाडी रस्ता या शहराच्या सर्वच भागात आ. राऊत समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.