
माढा – माढा तालुक्यातील जाधववाडी येथील महेश औदुंबर भाकरे यांची भारत सरकारच्या आयकर विभागात कार्यालयीन अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार धनाजीराव साठे नगराध्यक्षा अॅड मीनल साठे दादासाहेब साठे यांच्या वतीने महेश भाकरे याचा सत्कार माढा येथील साठे यांच्या मित्र प्रेम निवासस्थानी आयोजित केला होता..
याप्रसंगी माजी आमदार साठे यांनी सांगितले की, महेश भाकरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत.. अनेक संकटांवर मात करत त्याने हे यश संपादन केले असून.. त्याचे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.. प्रत्येक तरुणाने मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर येऊन यशाच्या नव्या वाटा शोधत राहावे.. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की प्राप्त होते.. महेशच्या आई-वडिलांनी आजपर्यंत केलेल्या संघर्षाचा आणि कष्टाचं महेशने चीज केलं.. महेशच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्नपूर्तीचा अभिमान हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असून.. प्रत्येक तरुणाने आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महेश भाकरे चा आदर्श घेऊन वाटचाल करावी असेही ज्येष्ठ नेते धनाजीराव साठे यांनी सांगितले..
याप्रसंग दादासाहेब साठे नगराध्यक्षा मीनल साठे,वेदांत साठे , नगरसेवक अजिनाथ राऊत उप अभियंता दळवे आदी मान्यवर उपस्थित होते.