
पद्मशाली शिक्षण संस्था सोलापुरातील नामांकित संस्था असून ही संस्था शंभर वर्षापासून शिक्षणप्रसाराचे कार्य करीत आहे. एका शहरात पूर्व प्राथमिक ते महाविद्यालय पर्यतच्या २२ शाखांमधून सर्व समाजातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मुक्तद्वार खुले करुन देणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. संपूर्ण भारतात इतकी प्रचंड व्याप्ती व शतकाची परंपरा असणारी पद्यशाली समाजातील ही एकमेव संस्था आहे.
संस्थेच्या डी.आर. श्रीराम इं. मि. स्कूल मधील इ. ६ वी च्या वर्गातील कु. अनुष्का श्रीकांत आरकाल ह्या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय Online भरतनाट्यम स्पर्धा चॅनल डान्ससाठी निवड झालेली आहे.
कु. अनुष्का श्रीकांत आरकाल ही विद्यार्थिनी शाळेतून लहानपणापासून भरतनाट्मची कला अवगत केली आहे. नुकतेच तिने आंध्रप्रदेशातील नेल्लूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ऑनलाईन भरतनाटयम स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावले. विविध राज्यातून आलेल्या ४० स्पर्धकांतून तिची तिसऱ्या क्रमांकासाठी निवड झाली आहे.
जागतिक स्तरावरील ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जून पासून दर शनिवारी डान्स स्पर्धेसाठी निवड Activity म्हणून तयारी करुन घेतले जाते. प्राथमिक विभाग २ तास व माध्यमिक विभाग २ तासापर्यंत ही Activity घेतली जाते.
जानेवारी महिन्यात स्टार भारत चॅनेलसाठी शाळेच्या ग्रुप चा प्रथम व्हिडिओ तयार केला व पाठविला गेला. पहिली ऑनलाईन निवड करण्यात आली. नंतर हे राष्ट्रीय चॅनेल, T.V. रिअॅलिटी शो करिता Semi Finale साठी परत व्हिडिओ तयार करुन पाठविण्यात आला. Final साठी निवड झाली. आता Final साठी सराव सुरु आहे. Final फेरी हे त्यांच्या स्टुडिओ मध्ये होणार आहे. चॅनेल क्रं. 29X MTV साठी India Dance Power. Reality show साठी ऑडिशनसाठी Online Video पाटविण्यात आला. त्यातून Top 200 ऑल
इंडियामधून 200 डान्सरची निवड झालेली आहे. त्यातून मेघा ऑडिशनसाठी मुंबई येथे विद्यार्थी Offline थेट सादरीकरण करण्यात आले. त्यातून Top 50 मध्ये आपल्या शाळेची निवड झाली आहे. आता सप्टेंबर २०२६ मध्ये सादरीकरण करण्यासाठी जाणार आहेत.
तेलंगणा येथे झालेले “नुवा नेना” डान्स चॅम्पियनशिप नॅशनल लेव्हल डान्स स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी तेलंगणा संस्कृतीप्रमाणे ” बोनालू यल्लमा ” लोकनृत्य उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले. त्या स्पर्धेत ७१३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेतून आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावले. Trophy मेडल, सर्टिफिकेट मिळविले.
सदर शाळेचा दहावीचा निकाल सुरुवातीपासून १००% आहे.
सोमवार ते शुक्रवार संपूर्ण (अभ्यासक्रमावर भर)
सालाबादप्रमाणे (२०२५ – २६) या वर्षीही दहावीचा १००% निकालाची परंपरा कायम राखत
४५ विद्यार्थी विशेषज्ञ प्राविण्य मिळविले.
Sports Activity क्रीडा यावरही भर दिला जातो.
विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाठी सतत कार्यरत आहोत.





















