सांगोला – कडलास, ता.सांगोला येथील माणनदी जवळ कंटेनर व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाल्याची घटना शनिवार दि.२७ जून रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सागर भारत जाधव (वय-२७) व सुजाता सागर जाधव (वय-२४) दोघे रा.वाकी (शिवणे), ता.सांगोला, जि.सोलापूर हे पती-पत्नी दुपारी मोटार सायकल वरून कडलासहून सांगोल्याकडे येत होते. त्याचवेळी कंटेनर हा सांगोल्याकडून कडलासकडे जात होता. सदर दोन्ही वाहनांचा सांगोला-कडलास रस्त्यावरील माणनदी जवळ अपघात झाला. या अपघातात सागर जाधव व सुजाता जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना अमोल नानासो जाधव यांनी ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत ग्रामीण रुग्णालय, सांगोल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंखे यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे खबर दिली. पुढील तपास ग्रेड पोसई.भातुंगडे करीत आहेत. या अपघातात पती-पत्नीच्या झालेल्या निधनामुळे वाकी (शिवणे) गाव व परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
Post Views: 11