सोलापूर – कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि.१ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन,
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, आत्माचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी केले आहे.
Post Views: 10