बार्शी – जगभरात सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्य आणि मानवतावादी उपक्रमांसाठी कार्यरत असलेल्या रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या बार्शी शाखेच्या अध्यक्षपदी रोटेरियन नवनाथ गुल्हाने यांची सन २०२६-२७ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
रोटरीचे नवीन वर्ष १ जुलै २०२६ पासून सुरु होत असून अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ असा राहणार आहे. या कालावधीत ते रोटरी क्लब ऑफ बार्शीच्या विविध सेवा व सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व करणार आहेत. रोटेरियन नवनाथ गुल्हाने हे महाराष्ट्र क्लासेस, बार्शीचे संचालक असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शणि शैक्षणिक प्रबोधनासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना रोटेरियन नवनाथ गुल्हाने यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, युवक विकास आणि समाजोपयोगी सेवा प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला.
Post Views: 8