माळशिरस.. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजना अंतर्गत ६ प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजना तालुकास्तरीय समिती माळशिरस यांनी रस्ते अपघात, पाण्यात पडून मृत्यु, चेंगराचेंगरी चक्कर येऊन मृत्यू झालेल्या सहा प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे .सदरचे प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी माळशिरस कार्यालयामार्फत तालुकास्तरीय मंजुरी समिती माळशिरस यांच्याकडे सादर करण्यात आले असून तहसीलदार माळशिरस यांचे अध्यक्षतेखाली .तालुकास्तरीय समितीची मंजुरी सभा होऊन बंडू दुर्योधन भोसले(उंबरे वेळापूर), प्रकाश मारुती बरडे ,( माळशिरस), गणेश बाबासो चव्हाण( लोणंद), धोंडिबा गणपत पिंजारी ( धानोरे), तुकाराम नारायण पांढरे ( फोंडशिरस), हणमंत तात्या ढोबळे ( फोडशिरस) या सहा मृतांच्या वारसाना प्रत्येकी २ लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे
या ६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली अशी माहिती तहसीलदार माळशिरस सुरेश शेजुळ यांनी दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी माळशिरस आबासाहेब रुपनवर उपस्थित होते .या योजने संदर्भात अधिक माहिती व संपर्क करण्याचे आवाहन या योजनेचे तालुका समन्वयक तथा कृषी पर्यवेक्षक तंत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस जी एन मुळे कृषी पर्यवेक्षक माळशिरस संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Post Views: 5