सोलापूर – जिन्यावर चढताना विजेचा शॉक बसल्याने एका 39 वर्षीय सेंट्रींग मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे आज गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली . सोमनाथ चंद्रकांत कांबळे (वय 39 वर्ष रा.बाणेगाव ता.उत्तर सोलापूर) असे मयत मजुराचे नाव आहे. ते बिगारी म्हणून काम करायचे .त्याप्रमाणे आज गुरुवारी दुपारी वडाळा येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील बोळात ते सेंट्रींग कामावर बिगारी म्हणून काम करीत होते. जिन्यावर चढताना एम एस ई बी च्या विद्युत तारेचा त्यांच्या हाताला स्पर्श झाल्याने शॉक लागून ते वरून खाली पडून बेशुद्ध झाले . त्यांना वडाळा येथील आरोग्य केंद्रात नेऊन येथील शासकीय रुग्णालयात रवी तळभंडारे यांनी दुपारी साडेतीन वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .त्यांच्या पश्चात आई , पत्नी , एक मुलगा व भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 18