सांगोला – घरातील तक्रारीच्या कारणावरुन विहीरीतील पाण्यात पडुन बुडून आईसह मुलगी व मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना घेरडी, ता.सांगोला, जि.सोलापूर येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, बाळु बाबुराव थोरबोले, रा.शिरनांदगी, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे बुधवार दि.१ जुलै रोजी रात्री साडेसात वाजण्याच्यापूर्वी मुलगी वैष्णवी आशिष यमगर (वय-२८), नात तेजश्री आशिष यमगर (वय-३ वर्षे ६ महीने) व नातु रुद्राक्ष आशिष मयगर (वय-१५ महीने) तिघे रा.घेरडी, ता.सांगोला हे जावई आशिष महादेव यमगर यांचे घरासमोर असलेल्या शेतातील विहीरीत घरातील तक्रारीच्या कारणावरुन विहीरीतील पाण्यात पडुन बुडून मयत झाले आहेत. याबाबत योग्य ती चौकशी होणेस विनंती आहे अशी खबर दिली. पुढील तपास ग्रेड प्रोसई.राऊत करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे घेरडी गाव व परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
Post Views: 11