बदनापूर- बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथील
प्रगतीशील व नवनवीन उपक्रम राबवणारे कृष्णा कान्हेरे यांनी जैविक
शेती,शेतकरी मार्गदर्शन आणि सामाजिक कार्य यांचा अभ्यास करून राज्यस्तरीय
व सोबतच गुणवत्ता वाढीवर भर दिला. फळांची ग्रेडिंग,पॅकिंग आणि थेट
बाजारपेठेशी जोड निर्माण करून त्यांनी शेतमालाला अधिक मूल्य मिळवून दिले.
आज त्यांच्या सीताफळ बागेतील उत्पादन व्यापार्यांच्या पसंतीस उतरते.
गुणवत्ता आणि व्यवस्थापन यांचा उत्कृष्ट संगम त्यांनी साधला आहे.
कृष्णा कान्हेरे यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मिळविलेले
ज्ञान स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र,
आत्मा प्रकल्प, कृषी महाविद्यालये आणि विविध शासकीय संस्थांच्या
माध्यमातून आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात.
शेतकरी मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, प्रात्यक्षिके
यांद्वारे त्यांनी हजारो शेतकर्यांपर्यंत आधुनिक शेतीचे ज्ञान पोहोचविले
आहे. कीड नियंत्रण, जैविक शेती, जलव्यवस्थापन, पीक नियोजन आणि पूरक
व्यवसाय याबाबत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे.
कृष्णा कान्हेरे हे केवळ शेतकरी नसून सामाजिक कार्यकर्तेही आहेत.
वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, युवकांना मार्गदर्शन, ग्रामीण विकास आणि
शेतकरी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांचे कार्य अधिक व्यापक झाले
आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत ग्रामीण भागात
जनजागृती निर्माण केली आहे. शेती आणि समाज यांचे नाते अधिक मजबूत
करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पुरस्कारांनी गौरवलेले कार्य
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांनी
पुरस्कार व सन्मान देऊन गौरविले आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची
राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. मात्र पुरस्कारांपेक्षा शेतकर्यांच्या
चेहर्यावरचे समाधान हेच आपले खरे यश असल्याचे ते नम्रपणे सांगतात.
आजच्या काळात कृषी क्षेत्राला नव्या विचारांची गरज आहे. शेती ही तोट्याची
नाही तर योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि सातत्यपूर्ण
प्रयत्न यांच्या जोरावर फायदेशीर ठरू शकते, हे कृष्णा कान्हेरे यांनी
आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. मराठवाड्याच्या मातीतून उगवलेला हा
युवा शेतकरी आज हजारो शेतकर्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे.
त्यांच्या कार्यातून ग्रामीण भारताच्या नव्या विकासाची दिशा दिसते.
येणार्या काळात त्यांच्या या कृषी चळवळीचा लाभ अधिकाधिक शेतकर्यांना
मिळेल आणि शाश्वत शेतीचा संदेश राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचेल, अशी
अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















