सांगोला – श्रीधर व संजीव स्वामी महाराज यांचे हे श्री दत्त मंदिर पवित्र आहे. त्यामुळे या मंदिरात सर्वांनी पावित्र्य, शांतता व स्वच्छता राखा असे सुंदरगिरी महास्वामी यांनी प्रवचनात सांगितले. ते श्री दत्त मंदिर नाझरे वझरे ता.सांगोला येथे प्रभू श्रीराम मूर्ती स्थापना, कलशारोहण व समर्थ सद्गुरू संजीव स्वामी महाराज यांच्या गादी स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चैतन्य भारती महास्वामी, सुंदरगिरी महास्वामी, आनंदगिरी महास्वामी, भास्करगिरी महास्वामी, बजरंगगिरी महास्वामी, तुकारामगिरी महास्वामी, राघवेंद्रगिरी महास्वामी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मूर्तीची पूजा व महाआरती दादासो वाघमोडे व शुभांगी वाघमोडे, आकाश हिंगमिरे व हर्षदा हिंगमिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी रूपमती साळुंखे पाटील, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब झपके, पोपट गडदे, प्रशांत वलेकर, तनुजा एरंडे, चेतनसिंह केदार, किरण पांढरे, सुखदेव आधाटे, विनूबुवा पाटील, राजाराम अडसूळ व संजीव आश्रम सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार रविराज शेटे यांनी मानले.