सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. ३ जुलै) झोन क्रमांक ६, प्रभाग क्रमांक २३ मधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ते नागू नारायण वाडी चौक परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल १० टन कचरा आणि दोन ब्रास अजोरा हटविण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला.
या मोहिमेला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, राजशेखर पाटील आणि महेश देवकर उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी पानगल यांच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता देवकर, मुख्य आरोग्य निरीक्षक धरणे तसेच वनारोटे, दुड्डे, मस्के, पिडगुलकर आणि कु. कुरलिये यांनी मोहिमेचे नियोजन केले. मोहिमेत ३४ सफाई कर्मचारी तसेच उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जेसीबी व डंपरच्या साहाय्याने परिसरातील साचलेला कचरा आणि अजोरा हटविण्यात आला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून विविध प्रभागांमध्ये अशा विशेष स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहे.
—
Post Views: 9