बार्शी – बार्शीतील भगवंत मंदिर सनई चौघडा वादनाचे मानकरी भारत राऊत यांचे पुतणे चौथी पिढीतील सचिन राऊत हे सध्या थायलँड देशातील फुकेट शहरात रवाई बीच येथे लाँर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय (प्रती दगडूशेठ गणपती बाप्पा व मंदिर) गणेशभक्त अध्यक्ष Papachsorn Meepa madam व गणेशभक्त आ. श्री. चेतनदादा लोढाजी यांच्या निमंत्रणावरुन तसेच जगविख्यात शहनाई सुंद्रीवादक गुरुवर्य डॉ. पंडित प्रमोद गायकवाड व डॉ. अबोली सुलाखे, सरोद वादक बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली चौघडा व शहनाई वादनासाठी बार्शीतून थेट थायलंड फुकेट येथे रवाना, त्यांच्या तेथील वादनासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी तसेच बार्शीतील राऊत कुटुंबावर प्रेम करणाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व यापुढेही राऊत कुटुंबियांनी अशीच प्रगती करुन बार्शीच्या नावलौकिकात भर घालावी, अशी आशा व्यक्त केली. या कामी आमदार महोदयांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
Post Views: 11