बार्शी – विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या सन्मानार्थ आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. राजेंद्र राऊत यांनी दीप प्रज्वलन करुन केले. त्यांनी लायन्स क्लब या उपक्रमाचे व सेवा कार्याचे भरभरुन कौतुक केले. त्यांच्या आठवणीतील लायन्स क्लबने कोविड काळातील केलेल्या सेवाकार्याची आठवण करुन दिली. पुढील सेवा कार्यासाठी जिथे गरज लागेल तिथे मदत करण्याचे आश्वासनरुपी शुभेच्छा दिल्या. क्लबचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल याने क्लबचे सेवा कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याची संकल्पना मांडली. गरजू व गरजवंतांना मदतीसाठी कायम सेवेत राहू, अशी इच्छा व्यक्त केली. आरोग्य शिबिरासोबतच वृक्षारोपण लागवडीची संकल्पना ठेवली. हे शिबीर मार्केट यार्ड सौदे हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्ष श्री. दीपक वैद्य, नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, पं. स. च्या सभापती सौ. मीनाक्षीताई रोंगे, कृउबा समितीचे अध्यक्ष श्री. विजय गरड, सज्जन गायकवाड उपस्थित होते. या शिबिरामध्ये १७६ रुग्णांनी व्यक्तींनी लाभ घेतला. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यात ब्लड प्रेशर, शुगर तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना औषधेही देण्यात आली. आरोग्य शिबीर पीडीजी लायन जितेंद्र जोशी व राहुल दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष ला. मंगेश बागुल सेक्रेटरी ला. दयानंद रेवडकर, खजिनदार उमेश जाधव, प्रोजेक्ट चेअरमन ला. तन्मय बुडूख, ला. सुनील पाटील हे उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. गणेश भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन ला. दयानंद रेवडकर सर यांनी केले.
Post Views: 11