जेऊर – करमाळा येथे आयोजित सहविचारसभे निमित्त शिक्षक भारतीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष श्री. सुजितकुमार काटमोरे (सोलापूर) सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे पाठबळ अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच संघटनेची आगामी वाटचाल, भविष्यातील धोरणे आणि विविध संघटनात्मक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची ग्वाही दिली. संघटनेच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार ही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सहविचार सभेसाठी जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, रियाजअहमद अत्तार, विजय काशीद, शरद पवार, किशोर जाधवर, नितीन कुमार कांबळे, मारुती साखरे, संदिप तेलंगी, भारत चव्हाण सर, मायप्पा हाके, लक्ष्मीकांत खांडेकर, किरण शिंदे, आबासाहेब काळे, संदीप हिरवे, तनपुरे सर, बुरुटे सर आदि मान्यवर उपस्थित होते.