अकलूज – शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल शंकर नगर अकलूज येथील विद्यार्थ्यांना सुरक्षितता, छेडछाड प्रतिबंध, गुड टच- बॅड टच या विषयावर स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले
हे ट्रेनिंग निर्भया पथक अकलूज चे प्रमुख एएसआय मा. श्री समाधान देशमुख तसेच लेडीज कॉन्स्टेबल सौ. पद्मजा पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
अनोळखी व्यक्तीने हल्ला केल्यास स्वतःचा बचाव कसा करावा, आणि गर्दीच्या ठिकाणी सतर्क कसे राहावे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी बोलताना निर्भया पथकाचे प्रमुख म्हणाले “महिलांनी कोणत्याही संकटाला न घाबरता धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. शारीरिक सक्षमतेसोबतच मानसिक दृष्ट्या खंबीर होण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.”या शिबिरात शारीरिक कसरतींशिवाय ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘सोशल मीडियाचा सुरक्षित वापर’ यावरही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी ११२ (पोलीस नियंत्रण कक्ष) आणि १०९१ (महिला हेल्पलाईन) या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
रस्त्याने ये-जा करताना छेडछाड झाल्यास किंवा अचानक कोणी हल्ला केल्यास शारीरिक ताकदीचा नव्हे, तर योग्य तंत्राचा वापर करून शत्रूला कसे नामोहरम करावे, याचे धडे विद्यार्थिनींना देण्यात आले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री जितेंद्र माने देशमुख यांनी निर्भया पथक अकलूज यांचे आभार मानले. सदरील उपक्रमाचा लाभ इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांना मिळाला त्याचप्रमाणे मुलींना आरोग्य विषयक स्वच्छतेच्या सवयींचे विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास जागृत झाल्याची भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.