मंगळवेढा – शहरात मोटर सायकलस्वाराने मॉडीफाईड सायलेन्सर बसवून कर्कश आवाज केल्याप्रकरणी पोलीसांनी 11 मोटर सायकल स्वारावर 5 हजार 500 रुपयाचा दंड करुन कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यापुढेही ही कारवाई अधून मधून सुरु राहणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

मंगळवेढा शहरात तरुण मुले आपल्या मोटर सायकलच्या सायलेन्सर मध्ये मॉडीफाईड करुन मोठा कर्कश आवाज करीत जात होते. या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण तसेच लहान मुलांना,आजारी व्यक्तींना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार शहरामध्ये सुरु आहे. याची गांभीर्यपुर्वक दखल घेत डी.वाय.एस.डी.डॉ.बसवराज शिवपुजे यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांची बैठक बोलावून कारवाईच्या सक्त सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार रोजी शहरात दिवसभर कारवाईची मोहिम राबविली. यामध्ये 11 मोटर सायकली पकडून त्यांच्यावर 5 हजार 500 रुपयाचा दंड आकारण्यात आला. बिगर नंबर मोटर सायकल,वाहन चालकाकडे लायसन नसणे आदीवर कारवाई करण्यात आली. ही मोहिम फत्ते करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर,कुमार ढेरे,पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर,विजय पिसे, वाहतूक पोलीस हवालदार संभाजी यादव,पोलीस अंमलदार दिपक सांळुखे आदींनी परिश्रम घेतले.
चौकट :- मोटार सायकल स्वार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ज्या गॅरेज मध्ये असे सायलेन्सर बनवले जातात त्या मिस्त्री वर कारवाई करणे गरजेचे आहे.
Post Views: 7