सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, तपकिरी शेटफळ संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत एकल पालक महिला व लाभार्थी बालकांचा स्नेहमेळावा, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षीस वितरण व सन २०२६-२७ च्या योजना मंजुरी आदेशांचे वितरण सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर व पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना कॉलेजसाठी सॅगचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण मंडळाचे सदस्य जितेंद्र बनसोडे, ॲड. अक्षय बनसोडे, विशेष कार्यकारी अधिकारी भरतकुमार कांबळे व शंकर कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार सुधाकर कवडे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थापक अध्यक्ष तथा मानद प्रकल्प संचालक शत्रुघ्न कांबळे यांनी २०० लाभार्थ्यांपैकी ११५ बालकांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याची माहिती देत उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदानही लवकरच मिळणार असल्याचे सांगितले. नितीन थोरात यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली, तर डॉ. शुभम आगवणे यांनी योजनेचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी डॉ. अंकुशराव, राहुल मोरे, आनंद ढेपे, तसेच अतुल सटाले, गणेश मासाळ, चंदू बोडके, अनिता राऊत, शशिकला मलगणकर, भरतकुमार कांबळे, हर्षराज कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शशिकांत कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन शशिकला मलगणकर यांनी केले.
Post Views: 18