सोलापूर – शहरातील ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी एक अभिनव आणि पर्यावरणपूरक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांच्या या चमूने मानवी पाऊलखुणांच्या (Footsteps) मेकॅनिकल ऊर्जेचा वापर करून थेट वीज तयार करणारे ‘Smart-Step: Kinetic Energy Harvester’ (स्मार्ट-स्टेप: कायनेटिक एनर्जी हार्वेस्टर) यंत्र तयार केले आहे. या मशीनद्वारे दैनंदिन चालण्या-बोलण्यातून वाया जाणारी ऊर्जा साठवून ती वीज स्वरूपात वापरता येते, जी भविष्यातील ऊर्जा टंचाईवर एक उत्तम पर्याय ठरू शकते.

या प्रकल्पामध्ये बी.ई. अंतिम वर्षातील विद्यार्थी विजय बुरा, ओंकार ध्यामे, हर्ष बुरजे आणि हर्षद घोटणे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रकल्पाला प्रा. अभिजीत मळेकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे हा प्रयोग शास्त्रीय दृष्टिकोनातून अचूक रित्या पार पडला. विद्यार्थ्यांनी या संपूर्ण यंत्राची रचना (Mechanical Design), पायझोइलेक्ट्रिक मॅट्रिक्स वायरिंग (Electrical Integration), आणि चाचण्या स्वतः पार पाडल्या, ज्यामुळे त्यांच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्यात लक्षणीय वाढ झाली.
या यशस्वी उपक्रमास विभागप्रमुख डॉ. एस. बी.गदवाल आणि प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले. हा प्रकल्प केवळ शैक्षणिक पातळीवर मर्यादित न राहता पर्यावरण रक्षणासाठी आणि ग्रीन एनर्जी (Green Energy) क्षेत्रात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पायझोइलेक्ट्रिक सेन्सर्स आणि मेकॅनिकल स्प्रिंग मेकॅनिझमचा वापर करून तयार केलेले हे स्मार्ट टाईल मॉडेल सार्वजनिक ठिकाणी (उदा. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, मॉल्स) वीज निर्मितीसाठी किफायतशीर व टिकाऊ पर्याय ठरू शकते, ज्याचा उपयोग भविष्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो.
विद्यार्थ्यांच्या या संशोधनबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री एस. ए. पाटील, सचिव श्री एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
*फोटो ओळी :- विद्यार्थ्यांसमवेत प्रकल्प मार्गदर्शक प्रा.अभिजीत मळेकर व विभाग प्रमुख डॉ. एस. बी.गदवाल*
Post Views: 8