श्री मल्लिकार्जुन हायस्कूल,हत्तुरे नगर,सोलापूर येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक रमेश दिंडोरे होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,विनायक हत्तुरे,बसवराज कोरे,भारत राऊत उपस्थित होते.अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भाग्यश्री स्वामी,प्रणिती खसकी, समृद्धी वारकड,साधना पटणे,रेणुका गुरव, भीमबाई जमादार,रितिका राऊतराव, आराध्या कलबुर्गी,गौरी कल्लूरकर, आकांक्षा जाधव,सखु वाघमारे,तमन्ना जमादार,लक्ष्मी माने,अंकीता शेंडगे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
यावेळी प्रमुख व्याख्याते श्रीनिवास कोलप्याक यांनी जागतिक लोकसंख्या दिनाविषयी माहीती देताना लोकसंख्येची आकडेवारी व संख्यावाढीच्या समस्या,जन्मदर,मृत्युदर,लोकसंख्येची घनता याविषयी विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश दिंडोरे यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्यावाढीचा इतर घटकावर परिणाम कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अनिलकुमार गावडे,अमरनाथ कदारे व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता हौदे यांनी केले.तर सूत्रसंचालन संजना बनसोडे यांनी केले,तर आभार रमेश आगवणे यांनी मानले.
Post Views: 5