अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट 10K भक्ती रन २०२६ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या रविवारी सकाळच्या प्रहरी पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा आदि राज्यातून आलेल्या हजारहून अधिक धावपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. अपंग धावपटूचां देखील समावेश होता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! व हलग्यांच्या निनादात “भक्ती रन” स्पर्धेचा शुभारंभ न भुतोनी संपन्न झाला.*
या “आरोग्य ते अध्यात्म” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “भक्ती रन” स्पर्धा अक्कलकोटच्या पावन भूमीत संपन्न झाली. धावपटूनां शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला आहे.
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन व ध्वजप्रदान ख्यातनाम अभिनेते भरत जाधव, मयूर पाटील, श्री वटवृक्ष स्वामी महराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, आणि चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूरचे अतिश शहा, चंद्रशेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा ए.आय.एम.एस.(आंतरराष्ट्रीय मॅराथॉन आणि दीर्घ-अंतर शर्यतींची संघटना) प्रमाणित मार्गावर आयोजित करण्यात आली होती. मार्गावर धावपटूंना प्रेरणा मिळावी यासाठी पंचमहाभूत (पृथ्वी,जल,अग्नी,वायू आणि आकाश) या संकल्पनेवर आधारित प्रेरणादायी पोस्टर्स लावण्यात आले होते. उत्कृष्ट हायड्रेशन,वैद्यकीय मदत,फिजिओ,स्वयंसेवक आणि शिस्तबद्ध रेस व्यवस्थापनामुळे स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने स्वतः धावून सहभागी होत नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश दिला.
स्पर्धेतील विजेत्यांचा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, खजिनदार लाल राठोड, मनोज निकम, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, प्रथमेश इंगळे, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
*पुरुष गट (१६–३० वर्षे)*
• प्रथम : चैतन्य रुपनर
• द्वितीय : अभिनंदन सूर्यवंशी
• तृतीय : अंकुश हक्के
*महिला गट (१६–३० वर्षे)*
• प्रथम : ज्योती बन्ने
• द्वितीय : मोनिका वाळके
• तृतीय : भक्ती मगदूम
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, पोलीस प्रशासन, अमोलराजे मित्र मंडळ व लेझीम संघ, आरोग्य विभाग, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक, प्रायोजक आणि धनराज भुजबळ यांचे स्वयंनसेवक व स्पर्धक सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आयोजकांनी आभार मानले. या प्रसंगी प्रशांत आरबाळे, महेंद्र दुर्गावले, मुंबई, सोनाली ढवरे, बारामती, मनोज चिपळूणकर, धनराज भुजबळ, कु.परी प्रवीण देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जनार्धन मानमंडे रा. रायगड, या स्पर्धकाला न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी गडांच्या पाहणी करिता रु. ११ हजार ची देणगी दिले.
दरम्यान या भव्य “अक्कलकोट 10K भक्ती रन” या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. मॅरेथॉनच्या अधिकृत ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ करत रजिस्ट्रेशन लिंकचे लोकार्पण करण्यात आले होते. राज्यभरातील धावपटूंना या भव्य “भक्ती रन” मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे नोंदणी करता आले. यामध्ये ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा विविध गटांमध्ये सहभागी धावपटूंना बिब, टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षिसे, मेडिकल सपोर्ट, पौष्टिक नाश्ता तसेच उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळाला. भक्ती, फिटनेस आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवणारा हा उपक्रम राज्यभरातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि स्वामी भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरले. धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडाक्षेत्रास देखील महत्व देऊन कार्यरत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडाक्षेत्रास देखील महत्व देऊन कार्यरत आहे.
म्हणूनच अक्कलकोट १०कि.मी. भक्ती रन- २०२६ चे आयोजन करण्यात आलेले होते. उत्तर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून व क्रीडा विभागाकडून या स्पर्धेला सहकार्य लाभले. स्पर्धेच्या अगोदर झुंबा व हलगी नृत्य संपन्न झाले. त्या नंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
या प्रसंगी अतिश पवार यांच्या वाढदिवसानिमित्य या कार्यक्रमात सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमास न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, रोहित खोबरे, प्रवीण देशमुख, शीतल फुटाणे, प्रवीण घाटगे, निखील पाटील, गोटू माने, सिद्धेश्वर मोरे, सुमित घाटगे, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, मल्लिकार्जुन मजगे, अश्पाक काझी,सर्फराज शेख, रमेश हळसंगी, महांतेश स्वामी, असद फुलारी, संतोष माने, धनंजय निंबाळकर, समर्थ घाटगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, बालाजी पाटील, आकाश शिंदे, सागर शिंदे, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, प्रकाश सोनटक्के, गणेश सोनटक्के, हेमंत कल्याणशेट्टी, विश्वजित पाटील, धनंजय गडदे, नारायण गडदे, श्रीशैल रोडगे, अप्पू कलशेट्टी, सुमित कल्याणी, रोहित पाटील, डॉ. विपुल शहा, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. बसवराज चिनकेकर, डॉ. रुपाली जोशी, शिरीष जनार्धन, अंकित गर्ग, ऋतिक डांगे, प्रदीप माने, डॉ. पवित्रा मलगोंडा, डॉ. सिद्धेश्वर मलगोंडा, डॉ. विनायक बुदले, डॉ. मंजुषा मेंथे, डॉ. सचिन सांगोळगी, डॉ. प्रशांत वाली, मल्लिनाथ मसुती, अप्पी उंबराणीकर, विश्वनाथ देवरमणी, माणिकराव बिराजदार, प्रा. प्रकाश सुरवसे, डॉ. अर्जुन त्रीगोळे, डॉ. अर्जुन मुकुटराव, डॉ. अनिल उडचाण, लगमना माळी, शिशिर जन्नाराम, वैशाली जाधव, जयंत शिंदे, प्रशांत माने, प्रशांत साठे, योगेश पवार, अमर मसरे, रोहित मोरे, शुभम सावंत, ज्ञानेश्वर भोसले, राजाराम पवार, किरण पाटील, किरण साठे, विनायक भोसले, आकाश सूर्यवंशी, समर्थ घाटगे, भरत राजेगावकर, सायबण्णा जाधव, स्वामिनाथ बाबर, फहीम पिरजादे, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, विलास राठोड, मेजर किरण जाधव, राहुल भंडारे, राहुल इंडे, आकाश कवडे, रोहन खवाटे, दादासाहेब सपकाळे, अमृत खेडकर, हेमंत वाघमारे, दत्तात्रय काळे, आरती शहा, मनोज गायकवाड, स्वनिल शहा, तृप्ती शहा, अनुप शहा, अनघा शहा यांच्या सह राज्य, परराज्यातील धावपटू बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी धावपटू करिता फिजोथेरीपी व वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. स्पर्धकांनी दरवर्षी श्री क्षेत्र अक्कलकोटला भक्ती रन स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आयोजकाकडे केली. अन्नछत्र मंडळ व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांनी उत्कृष्ट रित्या केलेल्या नियोजनाचे स्पर्धकाकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार अतिश शहा यांनी मानले.
[ चौक ट
क्रिडागंणाची साफसफाई – स्पर्धे नंतर क्रिडागणांची साफसफाई करण्यात आली.याकामी अननछत्र मंडळाचे कायॅकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले व मित्र परिवार आणि सेवेकरी यांनी संपूणॅ क्रिडागणांची स्वच्छता केले.
Post Views: 12