सोलापूर -अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज 27 जुलै रोजी सोलापुरात विराट महामोर्चा तसेच घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, सोलापूर यांच्या वतीने सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे..
हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यू बुधवार पेठ येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट, सोलापूर येथे धडकणार आहे. मोर्चामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप, माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर तसेच रुक्मिणीताई लोंढे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध, संविधानातील आरक्षण हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समिती कडून करण्यात आले आहे.





















